प्रिय ग्रामस्थ बंधू-भगिनींनो,
ग्रामपंचायत शिवणसई ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने
विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
गावातील पाणीपुरवठा, रस्ते विकास, स्वच्छता आणि
विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी
करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आपल्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि युवकांना
संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
"स्वच्छ, सुंदर आणि विकसित शिवणसई हेच आपले स्वप्न."